Breaking

पिंपरी चिंचवड शहरात यंदाच्या वर्षी व्यापाऱ्यांस फटाके विक्रीस बंदी घालण्याची मागणी

पिंपरी चिंचवड  : पिंपरी चिंचवड शहरात यंदाच्या वर्षी व्यापाऱ्यांस फटाके विक्रीस बंदी घालण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशसचिव विशाल जाधव यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगात तैमान घातले आहे, त्यातून काही देश आता पूर्व परिस्थितीवर येत आहे. त्यात भारत हि आहे, मात्र भारत कोरोनाच्या महामारीतुन बाहेर पडत असताना आता दिवाळी तोंडावर आली आहे. कोरोना पीडितांना श्वास घेताना सर्वात जास्त त्रास होतो. हे फुफ्फुसांशी संबंधित आहे आणि जे कोरोनामधून बरे होतात त्यांना पूर्णपणे सामान्य होण्यासाठी खूप वेळ लागतो. आता सर्वत्र कोरोनातुन बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.


म्हणूनच यावर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी मध्ये फटाके फोडता येऊ नये आणि संपूर्ण परिसर प्रदुषण मुक्त रहावा यासाठी फटाक्यांपासून दूर रहाणे ही काळाची गरज आहे, पिंपरी चिंचवड शहर प्रदुषण मुक्त रहाण्यासाठी आपणच ही पाऊले उचलणे जरुरीचे आहे.


या साथीच्या रोगात, हा विषारी वायू कोठेही होम क्वारंटाईनमध्ये राहणाऱ्या रूग्णांसाठी अतिशय प्राणघातक ठरू शकतो. विषारी धुरामुळे कोणत्याही  जीवाला धोका होऊ शकतो.


वरिष्ठ डॉक्टरांच्या अहवालानुसार कोरोना कालावधीत फटाक्यांचा धूर प्राणघातक आहे. दिपावली मध्ये, शहर धुराने भरण्यापासून फटाक्यांच्या विषारी वायू पासून वाचवायची काळाची गरज आहे आणि संघर्ष करीत असलेल्या किंवा कोरोनामुळे ग्रस्त झालेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी देखील आपल्या हा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा