Breaking



धम्मचक्र प्रवर्तन ही ऐतिहासिक घटना - अतिशभाई खराटे

                  

मलकापूर : येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज ६४ वा धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेस स्थानिक रेल्वे स्टेशन जवळ स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.


अशोका विजयादशमी दिनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती केली व नागपूर दीक्षाभूमी येथे तथागत गौतम बुद्धांचा विज्ञानवादी, समतावादी बौद्ध धम्माची लाखो लोकांना दीक्षा देत सम्राट अशोकानंतर धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले या ऐतिहासिक घटनेला आज ६४ वर्षे पूर्ण झाले यामुळे करोडो जनतेचे उत्थान झाले व हे बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार आहेत असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा नेते अतिशभाई खराटे यांनी कार्यक्रमा प्रसंगी केले.

        

या धम्मचक्र प्रवर्तन कार्यक्रमास मलकापर तालुकाध्यक्ष सुशील मोरे, विलास तायडे, भाई शांताराम सोनवणे, सम्राटभाऊ उमाळे, पॅंथर तालुकाध्यक्ष आकाश इंगळे, भिमराज मोरे, सिद्धार्थ इंगळे, गणेश गायकवाड, सॅम वानखेडे, प्रशांत तायडे, निलेश मोरे, विनोद कोंगळे, सागर मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

1 टिप्पणी: