Breaking


दिल्लीत किसान संघटनांची व्यापक बैठक, कॉर्पोरेट धार्जिणी धोरणाविरोधात संघटना एकवटल्या


नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी -कामगार विरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिणी धोरणे हाणून पाडण्यासाठी २६ - २७ नोव्हेंबर रोजी होणारा देशव्यापी संपाची घोषणा अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने केली आहे. 


राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनाच्या तयारीसाठी आज २७ ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने बोलाविलेली देशभरातील किसान संघटनांची बैठक सुरू आहे. 

या बैठकीस अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे निमंत्रक व्ही. एम. सिंग, अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस हनन मोल्ला, अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, खजिनदार पी. कृष्ण प्रसाद, जनस्वराज चे नेते योगेंद्र यादव, दर्शन पाल सिंग, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी,  मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, आशिष मित्तल, सुनीलम, अविक साहा, श्वेता त्रिपाठी, कविता कुरुगंटी, किरण विसा व इतर किसान संघटनांचे नेते उपस्थित आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा