Breaking


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा व गटप्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढव करून दिवाळी बोनस देण्याची आयटकची मागणी

मुंबई  : महाराष्ट्रात कार्यरत आशा व गटप्रवर्तक यांनी कोरोना महामारीच्या काळात फ्रन्टफायटर, योध्दा म्हणुन जी भुमिका निभावुन कार्य केले ते उल्लेखनीय आहे. परंतु आशा व गटप्रवर्तक यांना राज्य सरकार ने मंजूर केलेले आशा यांना २००० रुपये व गट प्रवर्तक यांना ३००० रुपये मानधन अदयाप पर्यंत मिळाले नाही. ते जुलै २०२० पासून लागू केले मात्र अंमलबजावणी झालेली नाही.


तसेच या कोरोनाच्या संकट काळात आशा व गटप्रवर्तक यांनी स्वतःच्या कुटुंबाची, मुलाबाळांची व घरातील व्यक्तींचा विचार न करता, स्वतःचा जिव धोक्यात घालून कोरोना फ्रन्टफायटर म्हणुन काम केले, अशा कोरोना योद्धा आशा व गटप्रवर्तक यांना  राज्य सरकार कडुन दिपावली बोन्स मिळावा अशी मागणी आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक) ने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या कडे केली आहे.


राज्य सरकारने त्वरित दखल घेऊन वाढीव मानधन व बोनसचा निर्णय घ्यावा अन्यथा राज्यभर आमदारांच्या घरी जाऊन काळी दिवाळी साजरी करू तसेच तीव्र आंदोलनाचा इशारा राज्य अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले यांनी दिला आहे.


आयटक संलग्न महाराष्ट्र राज्यआशा व गटप्रवर्तक संघटनेचे नाशिक व नंदुरबार जिल्हा संघटक विजय दराडे, राज्य सचिव मायाताई घोलप, अलका भोये, हिरा गायकवाड, सुनिता सुरकुटे, पुष्पा जाधव, बेबी धात्रक, लता गायकवाड, ज्योती जाधव यासह कार्यकर्त्या उपस्थिती होत्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा