Breaking

सिटू प्रणित इंजिनिअरिंग लेबर युनियनच्या अध्यक्षपदी शशिकांत महांगरे तर सचिवपदी संजय कासुर्डे

पिंपरी चिंचवड : कोरस इंडिया लिमिटेड भोसरी या भारतातील सर्वात मोठ्या फाउंड्री कंपनीत इंजिनिअरिंग लेबर युनियन या सी. आय. टी. यू प्रणित कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी शशिकांत महांगरे आणि सचिव संजय कासुर्डे यांची निवड करण्यात आली.


तसेच उपाध्यक्ष पदी दत्तात्रय करंजखेले तर कार्यकारिणी सदस्य पदी राजेंद्र केंजळे, संजय आंब्रे नेताजी चौगले यांची निवड करण्यात आली.


कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर, कॉ. वसंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनियनची निवडणूक घेण्यात आली. भारतीय रेल्वे, टाटा मोटर्स, महिंद्र, अशोक लेलँड, फोर्ड, फोर्स मोटर्स इ. अवजड वाहने आणि कार कंपन्यांना गेली हेवी ड्युटी फॉर्जिंग पुरवठा करण्यामध्ये ही कंपनी आघाडीवर आहे.


महांगरे म्हणाले की, गेली वीस वर्षे अतिशय सलोख्याचे औद्योगिक संबंध निर्माण करून आर्थिक मंदीच्या काळातही कामगार आणि त्यांचे कुटुंब यांच्या जीवनमानात आर्थिक आणि कल्याणकारी फायदे मिळवले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात सीआयटीयू या मोठ्या कामगारसंघटनेच्या नेतृत्वाखाली अजित अभ्यंकर, वसंत पवार, तुकाराम साळवी यांच्या मारदर्शनाखाली पुढील वेतन करार अतिशय चांगला होईल याची आम्हाला खात्री आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा