Breaking

शिक्षकांचे आर्थिक शोषण आणि नोकरीतील समस्या हा कळीचा मुद्दा घेऊनच पुणे पदवीधर मतदारसंघात माझी उमेदवारी - प्रा. डॉ. निलकंठ खंदारे

पुणे : प्राथमिक शिक्षकांच्या समस्या, २०% अनुदानित, अंशतः घोषित अघोषित, जुनी पेन्शन तसेच नेट सेट, पीएचडी संबंधित समस्या आणी शिक्षकांचे आर्थिक शोषण हे आपले मुख्य मुद्दे राहणार असल्याचे प्रा. डॉ. निलकंठ खंदारे यांनी सांगितले.


पुणे पदवीधर मतदारसंघात प्रा. डॉ. निलकंठ खंदारे यांची उमेदवारी ही शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ आणि सोलापूर व पुणे विद्यापीठाशी संलग्न शिक्षक संघटना तसेच इतर २० पेक्षा जास्त शिक्षक शिक्षकेतर आणि राजकीय संघटना यांच्या पाठिंब्याने जाहीर केली आहे. डॉ. खंदारे हे शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य असून गेली २५ वर्षे ते शैक्षणिक चळवळीत सक्रिय सहभागी आहेत. ते स्वतः विनाअनुदानित आणी नेट सेट ग्रस्त सारख्या समस्यातून गेले आहेत, त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील एक जाणकार व्यक्ती म्हणून त्यांच्या पुणे पदवीधर च्या उमेदवारी कडे पाहिले जात आहे. 


प्राथमिक शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे, बदल्यातील राजकीयकरण यावर त्यांचा तीव्र आक्षेप आहे. जुनी पेन्शन मिळवणे, तासिका तत्त्वावरील शिक्षक, विनाअनुदानित अंशतः अनुदानित घोषित आणि अघोषित अनुदानाच्या संदर्भात न्याय देण्यासाठी आपण विधीमंडळात निकराचा लढा देऊन  शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.


व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकांना वेठबिगाराप्रमाणे राबवून घेण्यात येते, त्यांना वेळेवर पगार मिळत नाही, विद्यापीठाची मान्यता मिळत नाही, फंड आणी ग्रँचुईटी मिळत नसल्याने त्यांच्या आयुष्याला कसलीही स्थिरता मिळत नाही. वरिष्ठ महाविद्यालयात नेट सेट चा प्रश्न, त्यांच्या पेन्शनचा प्रश्न, पीएचडी च्या वेतनवाढी असा समस्यांचा डोंगर असल्याने त्यांची पदवीधरची उमेदवारी या सर्वांना न्याय देण्याची राहील असे शिक्षक संघटनांकडून सांगण्यात येत आहे.


डॉ. खंदारे यांनी पुणे पदवीधर साठी 1 लाख पेक्षा जास्त नाव नोंदणी केली असून ५ जिल्ह्यात त्यांचा दांडगा संपर्क आहे. सर्व शिक्षक आणी पदवीधर एकत्र येऊन या प्रश्नांवर आवाज उठवून  न्याय मिळवण्यासाठी आपल्या पाठीशी राहिले तर आपण निश्चितच ही निवडणूक जिंकू असा विश्वास त्यांना व त्यांच्या सहकारी शिक्षकांना वाटतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा