Breakingइस्लापूर येथे किसान सभेचे रास्ता रोको आंदोलन


गुंंठ्याला शंभर रूपये मदत शेतकऱ्यांना मान्य नाही - किसान सभा


किनवट (नांदेड) : शेतकऱ्यांच्या विविध  मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा वतीने आज (दि. २८) रोजी इस्लापुर राज्य महामार्गवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

किसान सभेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष अर्जुन आडे आणि शंकर सिडाम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात परतीच्या पाऊसाने झालेल्या शेतकऱ्यांना एकरी किमान २५ हजार रुपये आर्थिक मदत द्या, बॅकेचे कर्ज प्रकरण निकाली काढा, भोगवटदार जमिनी नंबर १ मध्ये रूपांतरित करा, पोटखराब जमिन सातबार्यावर दुरूस्त करा, रोजागार हमीची काम गावा - गावात चालू करा या मागण्या घेऊन हे  आंदोलन करण्यात आले. तबल दीड तास रस्ता रोकण्यात आला.

आंदोलनाच्या मागण्या संदर्भात तहसीलदार व भारतीय स्टेट बँक चे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. ठोस आश्वासन मिळाल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.

मान्य झालेल्या मागण्या पुढीलप्रमाणे :

◆ येत्या ११ नोव्हेंबर पर्यंत बँकेच्या सर्व कर्ज पिक प्रकरणे निकाली काढण्याचे लेखी घेण्यात आले.

◆ रोजगार हामीचे काम गावात सुरु करण्याचे, पोट खराब सात बारा दुरूस्त करण्याचे, भोगवाटदार जमिन दुरूस्त करण्याचे लेखी तहसीलदारांनी दिले.

◆ किनवट तालुका दुष्काळ जाहीर करुन सरकारची सरकट मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

◆ ११ नोव्हेबंर पर्यंत सर्व बकेचे कर्ज वाटप होणार.


यावेळी किसान सभेचे माजी राज्य कोन्सिल सदस्य, प्रभाकर बोड्डेवार, अनिल आडे, मा. पं. स सदस्य शेषराव ढोले, माजी सरपंच लिबांजी ढोले, माजी सरपंच यशवंत राठोड यांनी किसान सभेत प्रवेश केला.

आंदोलनात प्रल्हाद चव्हाण, खंडेराव कानडे, जनार्दन काळे, स्टॅलिन आडे, प्रभाकर बोड्डेवार, शेषराव ढोले, विशाल आडे, मनोहर आडे, पवन जेक्केवाड, सुशील ढेरे, नंदु मोदुकवार, प्रदीप जाधव, दिलीप जाधव, मधूकर राठोड, अनिल आडे, आनंद लव्हाळे, मोहन जाधव, प्रकाश बोड्डेवार, जंयवत राठोड, शैलीया आडे आदीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा