Breaking

खिरेश्वर गावातील ग्रामस्थांचा मनरेगा समजून घेऊन गावात रोजगार निर्माण करण्याचा निर्धार

जुन्नर (पुणे) :  खिरेश्वर गावामध्ये ग्रामस्थांच्या पुढाकाराने किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायद्याची गावातील ग्रामस्थांना माहिती दिली. गावाच्या विकासासाठी युवक / युवती / महिला यांनी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. रोजगारासाठी शहरात न जाता मनरेगा कायदा शिकून समजून घेऊन प्रशासनाच्या सहकाऱ्याने गावाच्या विकासाचे मॉडेल तयार करावे, कामाचा शेल्प तयार करावा. आणि मजुरांमध्ये याबाबत जनजागृती करावी. मजुरांना कामासाठी प्रेरित करावे. आणि कामाची मागणी करावी, असे किसान तालुका सचिव लक्ष्मण जोशी यांनी सांगितले.


जनतेचे शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रश्नांच्या उपाययोजनांसाठी मनरेगाची अंमलबजावणी करण्यासाठी गावातील तरुणांनी पुढे  येण्याचे आवाहन किसान सभेने केले. मनरेगाच गावासाठी मजुरांना स्वाभिमानाने जगाता येईल आणि  प्रामाणिक नेतृत्व देवू शकेल, असे ही ते म्हणाले.


२००६ चा योजना कायदा २०२० मध्येही जनतेला माहिती नसल्याने मजुरांकडून काम मागणी होत नाही. मनरेगा अंमलबजावणी यंत्रणेकडून किंवा प्रशासनाकडून कधीही याबाबत गावामध्ये माहिती दिली नाही. रोजगार दिवस कधीही साजरा केला गेला नाही. काम मागणी कशी करायची कोणाकडे करायची, कोण कोण कामाची मागणी करू शकतात. काय काम करायचे किती काम करायचे याबाबत कोणतीही माहिती नाही. अनेक कुटुंबाना जॉबकार्ड दिले गेले नाही. माहिती अभावी जॉबकार्डची गरजही मजुरांना वाटप होत नाहीत.


रोजगार हमी योजनेबाबत अनेक गैरसमज मजुरांमध्ये आहेत. त्यामुळे हा कायदा आतापर्यंत कागदावरच राहिल्याची खंत किसान सभेने व्यक्त केली आहे. 


किसान सभेच्या मार्गदर्शनाने अनेक बाबी पहिल्यांदाच माहिती झाल्याने खिरेश्वर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून किसान सभेच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.


तसेच आंबे ग्रामपंचायत चे सरपंचांनी मुकुंद घोडे यांनी त्याच्या गावात कशाप्रकारे मनरेगा अंतर्गत कामे चालू केली याची सविस्तर माहिती ग्रामस्थांना दिली.


यावेळी रोजगार हमी योजनेचे ३३ अर्ज भरुन घेण्यात आले. तसेच ग्रामसेवक यांच्याकडून पोच घेण्यात आली. यावेळी विशाल मेमाणे, गजानन मेमाणे यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे किसान सभेने म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा