Breaking

चाकण औद्योगिक वसाहतीत सर्वात अधिक बोनस; कामगार संघटनेचा परिणाम

चाकण : म्हाळुंगे मधील केहीन फाय प्रा.लि या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कामगारांना ३३००० रु इतका बोनस जाहीर करण्यात आला आहे. कोरोना कालखंडात कामगारांंनी कारखाना सुरक्षित चालवून अर्थचक्र गतिमान ठेवले. मोटर सायकल, बाईकचे उत्पादन करणाऱ्या भारतीय आणि परदेशी कंपन्यांना लागणारे कारबुरेटरची निर्मिती कंपनी करते. 


कोरोना काळात कामगारांनी लाईन बंद न करता बाईक कंपन्यांना वेळेत पुरवठा केला. त्यामुळे आदर्श बोनस करार झाला आहे, असे केहीनफाय कामगार संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी सांगितले.


मार्च महिन्यापासून लॉकडाउनच्या काळात कंपनीने कामगारांना पूर्ण पगार दिला आहे. कोरोना पोझीटीव्ह कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन असताना २८ दिवसांची पगारी रजा कंपनीने कामगारांना दिली आहे, त्याच बरोबर औषध उपचाराचा खर्च कंपनीने केला. चाकण औद्योगिक परिसरात आम्ही अंतर्गत युनियन म्हणून काम करत असताना औद्योगिक संबंध सकारात्मक ठेवले आहेत. वाहन उद्योगात असलेली प्रचंड स्पर्धेत टिकण्यासाठी कामगार आणि व्यवस्थापन याचे संबंध अतिशय मोलाचे असतात, हे संबंध चांगले असतील तर आर्थिक उन्नती होते, असे जीवन येळवंडे यांनी सांगितले.


दि. २८ ऑक्टोबर रोजी या करारावर कंपनीच्या वतीने प्लांट हेड श्रीकांत मापारी, वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक बाजीराव गाजी, व्यवस्थापक संपत फडतरे, प्रशांत ननावरे संघटनेच्या वतीने जीवन येळवंडे, सरचिटणीस सतीश पाटील, सचिव नरेश भोयर, उपाध्यक्ष रविंद्र महाजन, खजिनदार विकास कासुर्डे, दत्तात्रय गायकवाड, प्रदीप बोरुडे, शंकर गडदे यांनी सह्या केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा