Breaking

संपाने ऊसतोड कामगारांना काय दिले ? जाणून घ्या अर्थकारण !


पुणे : ऊसतोडणी कामगारांचा गेल्या २० दिवसापासून संप चालू होता. विविध मागण्यांना घेऊन सुरु असलेला संप अखेर आज स्थगित करण्यात आला.


आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बुद्र. येथे खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये संप स्थगित केल्याची घोषणा कामगार संघटनांनी केली, असल्याची माहिती महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटना (सिटू) चे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी दिली.

सर्व संघटना खा. पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, असे म्हणत असताना सिटू संलग्न महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटना शेवटपर्यंत आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याची माहिती सुत्रांकडून समजते.

ऊसतोड कामगारांचे पारडे जड ठरणारा हा संप होता. न्यायासाठी चालेला लढा यशस्वी झाला असल्याचे ऊसतोड कामगारांनी म्हटले आहे. अनेक ठिकाणी कामगारांनी ऊसाच्या फडात जाऊन आनंदोत्सव साजरा केला.

 या संपाने काय दिले ?

१. कराराचा कालावधी तीन वर्ष - २०२० - २१, २०२१ - २२, २०२२ -२३ 

२. मजुरी दरामध्ये १४ टक्के वाढ (मागील असणाऱ्या दरामध्ये)

३. मुकदाम कमिशनमध्ये अर्धा टक्के वाढ. सध्याचा मुकदम कमिशन दर १८.५० टक्के आहे. तो १९.०० टक्के होईल.

४. ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना.

५. ऊसतोड कामगारांना विमा.

६. ऊसतोड कामगारांची नोंदणी.

७. ऊसतोड कामगारांच्या मुलांना शाळा.

८. ऊसतोड कामगार महिला मुलींसाठी आरोग्य सेवा.

प्रति टनास दरवाढ खालीलप्रमाणे :

१. डोकी सेंटर
सध्याचा दर रुपये        = २३९.६०
+  १४ टक्के रुपये       =   ३६.५४
+  १९ टक्के कमिशन   =   ५१.९०
एकूण दर रुपये            = ३२५.०४
झालेली वाढ प्रतिटन रुपये ३४.९१

२. गाडी सेंटर
सध्याचा दर रुपये          =  २६७.३५
+ १४ टक्के वाढ रुपये  =    ३७.४३
+ १९ टक्के कमिशन          =   ५७.९०
एकूण दर रुपये             =  ३६२.६८
झालेली वाढ प्रतिटन रुपये ३८.९५

३. टायर गाडी
सध्याचा दर रुपये          =   २०८.३०
+ १४ टक्के वाढ रुपये   =      २९.१६
+ १९ टक्के कमिशन          =      ४५.११
एकूण रक्कम रुपये       =    २८१.५७
झालेली वाढ प्रतिटन रुपये ३०.३४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा