Breaking

"सर्व्हे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या" या मागणीसाठी वंचितचे मलकापूरात धरणे

मलकापूर : परतीच्या पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या उडीद, मूग, ज्वारी, सोयाबीन, कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी फार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे, मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली असून अद्याप पर्यंत मलकापूर तालुक्यात सर्वे सुरू झाले नाही, यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुलढाणा जिल्हा नेते अतिश खराटे यांच्या मार्गदर्शनात व तालुकाध्यक्ष सुशील मोरे यांच्या नेतृत्वात मलकापूर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.


शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, पीक विम्याची रक्कम नाही, नुकसान झालेल्या पिकांचा सर्वे नाही, ओला दुष्काळ अशा परिस्थितीत निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांची दरवर्षी अत्यंत दयनीय अवस्था निर्माण होत आहे या आपातग्रस्त शेतकऱ्यांचा शासनाने त्वरित सर्वे करून आर्थिक मदत करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करील असा इशारा जिल्‍हा नेते अतिश खराटे यांनी धरणे आंदोलन प्रसंगी दिला.


संपूर्ण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या वर्षी पीक आणेवारी 50 टक्के आत दाखवण्यात यावी, तालुक्यात सर्वे करून हेक्‍टरी 50 हजार रुपये तात्काळ मदत द्या, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा करा, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करून सातबारा कोरा करा या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांना तहसीलदार मलकापूर मार्फत देण्यात आले.


या आंदोलन वेळी जिल्हा उपाध्यक्ष भाऊराव उमाळे, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत कळासे, शहर अध्यक्ष शेख यासिन कुरेशी या प्रमुखासह गणेशभाऊ सावळे, दिलीप वाघ, राजू शेंगोकार, किशोर मोरे, दगडू राणे, विनोद निकम्, अनिल पाचपोळ, डिंगम्बर मोरे, अशोक तायडे, मोहन सावळे, आर.एन. वानखेडे, भीमराज मोरे, निलेश झनके, गणेश गायकवाड, पी.डी.पवार, मधुकर निकम, वामनराव वानखेडे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा