Breaking

संजय गांधी निराधार जनरल योजनेचे अनुदान दिवाळीपूर्वी वाटप करा ; महाराष्ट्र राज्य शेतमजुर यूनियन लाल बावट्याची मागणीमाजलगाव  : तालुक्यातील संजय गांधी जनरल निराधार योजना लाभार्थ्यांचे माहे जुलाई ते ऑक्टोबरचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करून दिवाळीपूर्वी वाटप करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शेतमजुर यूनियन लाल बावटा तालुका कमिटीच्या वतीने माजलगावचे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


सध्या लॉकडाऊन परिस्थिती असल्यामुळे ग्रामीण भागात पुरेशा रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. तसेच दिवाळी सणासुदीच्या दिवसात या लाभार्थ्यांना मदतीची गरज आहे. अनुदान प्राप्त न झालेल्या लाभार्थ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटा माजलगाव तालुका कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी मागण्या करण्यात आल्या.


◆ संजय गांधी जनरल निराधार योजना लाभार्थ्यांचे माहे, जुलाई ऑक्टोबरचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करून दिवाळीपूर्वी वाटप करा.
◆ मंजुरी समितीची बैठक प्रत्येक महिन्याला आयोजित करा, मार्च महिन्यात दाखल केलेले अर्ज मंजूर करा.
◆ पात्र लाभार्थी असूनही काहींचे अनुदान जून २०१९ पासून बंद केले आहे ते पूर्वीप्रमाणे चालू करा.
◆ सर्व लाभार्थ्यांना प्रतिमाह ३००० रु. अनुदान द्यावे.

या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस कॉ. सय्यद रज्जाक, तालुका अध्यक्ष कॉ. बंडूराम गरड, तालुका सचिव कॉ. पांडुरंग उबाळे, शांतिलाल पटेकर, सजीव गणगे, अश्रुबा गाढ़वे, उद्धव कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांचे माहे जुलै ते ऑक्टोबरचे अनुदान तसेच काही लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात प्राप्त झालेली नाहीत. सर्वांचे अनुदान दिवाळी पूर्वी त्यांच्या खात्यात वर्ग करून वाटप करण्यात यावे, अन्यथा १२/११/२०२० रोजी तहसिल कार्यालय समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल.

कॉ. सय्यद रज्जाक
सरचिटणीस 
महाराष्ट्र राज्य शेतमजुर यूनियन लाल बावटा बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा