Breaking

अनिकेत बनसोडे यांचा शासकीय कोट्यातून एम.बी.बी.एस साठी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी केला सत्कार

नाझरे : येथील अनिकेत अशोक बनसोडे यांची वैद्यकीय क्षेत्रातील एम बी बी एस साठी भारतीय बी बी एस कॉलेज सांगली या कॉलेजमध्ये शासकीय कोट्यातून प्रवेश मिळाला आहे, अनिकेत बनसोडे यांना एम.बी.बी.एस साठी प्रवेश मिळाल्याबद्दल नवनाथ बंडगर, रवी बंडगर, सिताराम बंडगर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार नुकताच संपन्न झाला. यावेळी सिताराम बनसोडे, नामदेव बनसोडे, कृष्णदेव बनसोडे, प्रा.अशोक बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.


अनिकेत बनसोडे हे श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नाझरेचे प्राध्यापक अशोक बनसोडे यांचे चिरंजीव आहेत. अनिकेत बनसोडे यांचे माध्यमिक शिक्षण श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नाझरे येथे झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण सिंहगड कॉलेज पुणे येथे झाले आहे. नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नाझरे या प्रशालेने आजवर अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले आहेत. या प्रशालेचे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात आपले स्वतःचे, प्रशालेचे व नाझरे गावाचे नाव अभिमानाने उंचावताना दिसत आहेत. त्याचेच एक उदाहरण म्हणजे अनिकेत होय. 

            

अनिकेतच्या या यशाबद्दल श्रीधर शिक्षण संस्था नाझरेच्या उपाध्यक्षा यमुना पाटील, सीतादेवी चौगुले,  मुकुंद पाटील, आर.टी काझी, धर्मराज बोराडे, के. एस. माळी, डॉ प्रभाकर माळी, प्राचार्य पी.डी परिचारक तसेच श्रीधर कन्या प्रशाला, लक्ष्मी विद्यालय राजुरी येथील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. तसेच अनिकेतच्या या यशाबद्दल त्याला विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत व अनिकेत या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा