Breaking


प्रमोटेड सेमिस्टरचे परीक्षा शुल्क चालू सेमिस्टरला गृहीत धरा; 'एसएफआय'ची मागणी


नागपूर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एस एफ आय) या विद्यार्थी संघटनेने मागच्या सेमिस्टर (प्रमोटेड सेमिस्टर) चे परीक्षा शुल्क हाच चालू असलेल्या (वर्तमान) सेमिस्टर चा परीक्षा शुल्क म्हणून ग्राह्य धरावे, अशी मागणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठाच्या कुलगुरूंंकडे ई - मेल निवेदनाद्वारे केली आहे.


अंतिम वर्ष वगळता बाकी सर्वच सेमिस्टर च्या विद्यार्थ्यांना कोरोना च्या साथीमुळे पुढच्या सेमिस्टर ला प्रमोटेड करण्यात आलं आहे. प्रमोट केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा कोरोनाचा साथी मुळे होऊ शकली नाही. त्यामुळे विद्यापीठाला देखील परीक्षांसाठी लागणारा उत्तर पत्रिका, कर्मचारी व इतर काही सोयी चा खर्च आला नाही. विद्यापीठाला खर्च फक्त प्रमोटेड विद्यार्थ्यांचा मार्कशीट प्रिंट करायचाच खर्च आला. या उन्हाळी परीक्षांची फीस विद्यार्थ्यानी पूर्वीच भरली होती. प्रमोटेड विद्यार्थी आता पुढच्या सेमिस्टर ला गेले. आणि त्यांची ऍडमिशन ही विद्यापीठात पार पडली. आता हिवाळी परीक्षांच्या (वर्तमान सेमिस्टर च्या) एक्साम फीस भरण्याची सूचना विद्यार्थ्यांना विद्यापीठाने दिली आहेत.

कोरोना मुळे अनेक लोकांचा रोजगार गेलेला आहे. त्यातही बहुतांश विद्यार्थ्यांचे पाल्य शेतकरी कुटुंबातील आहे. आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागात हवामान बदलामुळे हाथी आलेलं पीक ही गेलं आहे. 

अश्या परिस्थितीत विद्यापीठांनी मागच्या सेमिस्टर चा परीक्षा शुल्क हाच या सेमिस्टर चा परीक्षा शुल्क म्हणून ग्राह्य धरावे, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेने निवेदनद्वारे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा