Breaking

बिहार निवडणुका : मतमोजणी सुरू महागटबंधनची पिछाडी; निकाल येण्यासाठी लागू शकतो वेळ

बिहार : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभेच्या निकालात नीतिशकुमार चौथ्यांदा मुख्यमंत्री होणार की तेजस्वी यांचे तेज झळकणार, हे आता काही तासांनी कळणार आहे. विधानसभेच्या २४३ मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी झाली असून, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एनडीए आघाडीवर होते. ३८ जिल्ह्यात ५५ ठिकाणी ही प्रक्रिया होत आहे. याबाबत सोमवारी निवडणूक आयोगाने व्हिसीद्वारे सर्वकाही ठीक आहे की नाही, हे जाणून घेतले.


राम मंदिराच्या मुद्यावर, पुलवामाच्या घटनेचा परत उद्घोष करत आणि कोरोना लशीच्या विनामुल्य वितरणाचे आश्वासन देत केंद्रातील सत्ताधारी आणि राज्यातील सरकार मधील भागीदार असलेल्या भाजपने मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.


एनडीए आणि महाआघाडी या दोघांनी सरकार स्थापनेचे दावे केले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी संजय कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गामुळे खबरदारीचे उपाय म्हणून गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ७३ हजार अधिक मतदान केंद्र स्थापन केले होते. त्यामुळे निकालाला विलंब लागू शकतो. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. प्रारंभी पोस्टल बॅलेटची मोजणी होईल आणि त्यानंतर साडे आठ वाजता इव्हीएम मतांची मोजणी सुरु होईल. या प्रक्रियेनंतर निकालाचे कल हाती येण्यास ४५ मिनिटे लागू शकतात.


आता दुपारी 1 वा. NDA 127 जागांनी पुढे आहे तर महागठबंधन 103 जागांवर लिडिंगला आहे. हेच चित्र सकाळी उठले होते त्यातच एक्झिट पोलने लावलेला अंदाज चुकीचा ठरतो की काय हे आता काही वेळानंतरच समोर येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा