Breaking

बिहार निवडणूक : अखेर रात्री उशिरा निकाल स्पष्ट या पक्षाला मिळाल्या इतक्या जागा

पटना  : अखेर रात्री राशीरा पर्यंत चाललेल्या बिहार विधानसभाचे निकाल लागले आहेत. राजदला सर्वाधिक 75 जागा मिळाल्या असल्या तरी महागटबंधनच्या हाती निराशाच आली आहे. भाजप आघाडी (एनडीए) ला एकूण 125 जागा मिळाल्या आहेत तर महागटबंधनला 110 जागांवर समाधान मानावे लागले आहे.


निकाल काल दुपारी तीनच्या सुमारास स्पष्ट झाल्यावरही भाजप नेते दिवसभर उत्साहात पण सावधपणे वावरताना दिसले. लोकसभा किंवा राज्यांमध्येही भाजप-एनडीएला स्पष्ट बहुमत मिळते त्यावेळेस असणारे आनंदी वातावरण आजही होते पण दिवसभर जल्लोषाचा मागमूसही नव्हता.


भाजप आणि नितीश कुमार यांना बहुमत मिळणार नाही, हे एक्झिट पोलचे अंदाज मतदारांनी धुळीस मिळविले असून, या आघाडीलाच सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. पण भाजपला संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागा मिळाल्याने नितीश पुन्हा मुख्यमंत्री होतील का, हा प्रश्न आहे. दुसरीकडे सर्वाधिक जागा तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने मिळविल्या असून, आमचेच सरकार येणार आणि बिहारमध्ये सत्तांतर होणार, असे राजदचे नेते ठामपणे सांगत आहेत.


कुणाला किती जागा मिळाल्या :- 

भाजप - 74

राजद - 75

जेडीयु - 43

काँग्रेस - 19

डावे - 16

एमआयएम - 5

 

एकूण :- 

भाजप आघाडी (एनडीए) -125

महागटबंधन - 110

इतर - 8

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा