Breaking
शेलविहिरे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

अकोले (अहमदनगर) : क्रांतिवीर बिरसा मुंडा व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा संयुक्त जयंती  सोहळा दिनांक  15 नोव्हेंबर रोजी शेलविहिरे या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. बिरसा मुंडा  यांचा इतिहास सर्व जगाला ज्ञात आहे. भारतीय इतिहासातील हे एक विर लढवय थोर क्रांतीकारक होते. 


आदिवासी सामाजाला एकत्रीत करून आपल्या तिरकाठ्याने इंग्रजाना सळोकी पळो करून सोडणारे असे क्रांतीकारक बिरसा मुंडा‌ त्यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इतिहास अभ्यासक प्रा. लहू मुठे होते.


सदर कार्यक्रमात विविध सांस्कृतिक तसेच पारंपारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने आदिवासी कामडावणा नृत्य सदर करण्यात आले.


कार्यक्रमाचे सुत्रसंचाल रोहिदास जंगले यांनी केले. तर आयोजन रवींद्र सावळे, उल्हास देठे, रोहिदास जंगले, विजय सावळे, सागर दुटे, अजय जंगले, नितीन भांगरे व वरसुआई तरुण मित्र मंडळ शेलविहिरे यांंनी केले होते. या कार्यक्रमाला समस्त गावकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा