Breaking

घोडेगाव येथे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांना जयंतीदिनी अभिवादन !

घोडेगाव (आंबेगाव) : आदिम संस्कृती अभ्यास संशोधन, संस्था  व अखिल भारतीय किसान सभा यांच्या वतीने आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.


याप्रसंगी बी. डी. काळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव, डॉ. सुभाष जाधव, डॉ. राहूल जोशी, डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर, डॉ.भीमा केंगले, मुलानी, प्रा.करंदीकर, धोंडू आंबवणे, नवनाथ मोरे इ. उपस्थित होते.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी आजच्या प्रश्नांना भिडताना क्रांतिकारक, समाजसुधारक यांच्या विचारांची शिदोरी नक्की उपयुक्त ठरेल. त्यामुळे क्रांतिकारक व समाजसुधारक यांचे विचार समजुन घेणे किती गरजेचे आहे हे नमूद केले.


याप्रसंगी अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अमोल वाघमारे, राजू घोडे, अशोक पेकारी, कमल बांबळे, तृप्ती दुरगुडे, महेश गाडेकर इ. उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा