Breakingरामटेक येथे DYFI चा स्थापना दिवस साजरा

 


रामटेक (नागपूर) : डेमॉक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेने ४० वा स्थापना दिवस हिवरा येथे " भारतीय स्वातंत्र्य चळवळ " या विषयावर व्याख्यान आयोजित करून साजरा केला. 


प्रमुख व्याख्याते डीवायएफआय चे माजी केंद्रीय समिती सदस्य कॉ. अरुण लाटकर यांनी उपस्थितींंना संबोधित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीवायएफआय नागपूर जिल्हा अध्यक्ष भारत अडकणे हे होते. 


यावेळी मार्गदर्शन करताना लाटकर म्हणाले, जनतेचे मूलभूत प्रश्न जेव्हा उचलले जातात, तेव्हा जाती, धर्म सांप्रदायिकतेचे मुद्दे हे बाजूला पडतात. जेव्हा हे लढे कमजोर होतात तेव्हा जाती, धर्म सांप्रदायिकता वाढत जाते. हा महत्वाचा संदेश आपल्याला या स्वतंत्र लढ्यातून मिळतो.


गेल्या ४० वर्षापासून डीवायएफआय सर्वांना मोफत शिक्षण आणि रोजगारासाठी लढताना धर्मांध शक्तींचा ही सामना संघटनेने केला आहे. यात अनेक कार्यकर्त्यांनी आपले प्राण ही दिले आहेत, असे भारत अडकणे यावेळी म्हणाले.  


यावेळी अमित हटवार, संदेश रामटेके, संघर्ष हटवार, राम येलके, सागर वाहणे, संदेश मेश्राम, सुरज डुंडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रीतम वासनिक यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा