Breakingनागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे - डॉ. किशोर खिलारे

पिंपरी (पुणे) : कोरोना व्हायरसने  जगभरात पुन्हा एकदा दुसरे संक्रमण सुरु केले आहे. त्यामुळेच फ्रान्स, इंग्लंड, युरोपीय देशांनी देखील पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. ब्रिटेनमध्ये लॉकडाऊन - २ ची घोषणा करण्यात आली आहे. इटली सरकारने शिस्त पाळण्याचा इशारा दिला आहे,राजधानी दिल्लीत रुग्णसंख्या पुन्हा वाढली आहे.


पिंपरी चिंचवड शहरात दिवाळी नंतर शहरात गर्दीवर स्वयंशिस्त पाळली नाही, तर संक्रमण वाढण्याची दाट शक्यता आहे, असे शहरी आरोग्य अभ्यासक डॉ. किशोर खिल्लारे यांनी सांगितले.


गेले दहा महिने मनपाच्या आरोग्य विभागाला प्रचंड लढाई लढावी लागली आहे. कोरोना विरोधातील लढा यशस्वी करण्यासाठी नियमांचे कडक पालन करा, अन्यथा शहरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल.

     

सर्वेक्षणात सातत्य, चाचणी, संपर्कशोध, क्वारंटाईन व उपचार ह्या चारसुत्रावर 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीमेला अधिक गतिमान ठेवणे गरजेचे असुन  नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मास्कचा वापर, सहा फुटांचे सुरक्षित अंतर व हात साबणाने स्वच्छ धुणे किंवा सॅनिटायजरचा उपयोग ह्या कोरोना संसर्ग प्रतिबंधक सुचनांचे काटेकोर पालन करावे, असे ही खिल्लारे म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा