Breakingकॉ. गंगाधर गायकवाड यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान

 


नांदेड : अखिल भारतीय पत्रकार संपादक असोसिएशन नवी दिल्ली शाखा हदगांव यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते कॉ. गंगाधर गायकवाड यांना कोविड योध्दा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

लॉकडाऊन काळात जिवाची पर्वा न करता गंगाधर गायकवाड हे रस्त्यावरची लढाई लढून सामान्य कामगार कष्टकर्‍यांना न्याय देण्यासाठी झुंजारपणे लढत होते. राजस्थान, बंगाल, केरळ तसेच पक्षाच्या निगडीत कामगार नांदेड येथे अडचणीत अडकल्याचे त्यांना कळल्यावर त्यांनी निर्भिडपणे रस्त्यावर उतरून संबंधित कामगारांना मदत केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने त्यांनी अनेक गरजूंना मदत केली आहे. अन्यायाच्या जोखडात अडकलेले कामगार, कर्मचारी  आशा, गट प्रवर्तक, रेल्वे मजदूर, कंपनी कामगार, विद्यापीठातील कामगार, असंघटीत कामगार, ऍटो व वाहन चालक, उमेद व सीटू संलग्न असलेले अनेक कामगारांना न्याय मिळावा म्हणून नांदेडमध्ये त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. 

या काळात त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील झाले आहेत. परंतु त्यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी गुन्ह्याची तमा न बाळगता रस्त्यावरची लढाई कोरोना काळात यशस्वीरित्या लढली आहे. 

गायकवाड यांंच्या कामाची दखल घेत अखिल भारतीय पत्रकार, संपादक असोसियशनच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते कोविड योध्दा सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी असोसियशनचे पत्रकार धर्मराज गायकवाड, सचिन मुगटकर, संतोष वाघमारे, श्याम लाहोटी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा