Breaking
DYFI तलासरी तालुका मेळावा उत्साहात संपन्न

 

डहाणू (पालघर) : डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) च्या स्थापना दिनी तलासरी तालुक्यातील कॉम्रेड गोदावरी परुळेकर भवन येथे मेळावा उत्साहात संपन्न झाला.


मेळाव्याची सुरुवात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी बारक्या मांगात यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले. प्रस्ताविक DYFI तलासरी तालुका सचिव राजेश खरपडे यांनी केले. मेळाव्याच्या अध्यक्षास्थानी सुहास सुरती होते. यावेळी DYFI राज्याध्यक्ष सुनील धानवा यांची प्रमुख उपस्थितीत होती.


यावेळी धानवा म्हणाले की, संघटना मजबूत करणे घरजेची आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला असताना आता युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी लढा उभारण्याची गरज आहे.


यावेळी DYFI ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार हाडल, जिल्हा सचिव सुरजी वेडगा, तलासरी नगरपंचायत उपनराध्यक्ष सुरेश भोयर ह्यांनी सुध्दा मार्गर्शन केले. यावेळी. मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. विजय भोये यांनी आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा