Breaking

रशियातील विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यास अडचणी; शासनाने मदत करण्याची DYFI ची मागणी.

पुणे : रशियामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थी मायदेशी परतण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सुमारे १२० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत.


हिवाळा सुरु झालेला आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही खबरदारी घेत रशियन प्रशासनाने विद्यार्थ्यांचे ऑफलाईन होणारे क्लास रद्द करुन पुढील काही महिन्यांंसाठी ऑनलाईन करणार असल्याचे कळवले आहे. त्यामुळे हे विद्यार्थी भारतात परतण्यासाठी निघणार आहेत.  


विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी सबंधित विमान गुरुवारी ( दित्र १२) रोजी रशियाची राजधानी मास्को येथून निघणार आहे. हे विमान मास्को येथून दोहा मार्ग जाणार आहे. परंतु भारतीय अंम्बेसी येथून या विमानाने जाता येणार नाही असे सांगण्यात आले. जायचे असेल, खाजगी विमानाने जावे, असे ही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.


त्यासाठी गुरुवारच्या विमानाची तिकिटे रद्द करुन थेट भारतात जाणाऱ्या खाजगी विमानाने जावे असे सांगण्यात आले. आरक्षण तिकिटे रद्द केल्यास विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे। सर्वच विद्यार्थी तितके आर्थिकदृष्ट्या सबल नसल्याचे ही म्हणणे आहे. पिंपरी - चिंचवड शहरातील आफताब रजमुद्दीन शेख हा विद्यार्थी रशियात असून त्याला मायदेशी परतायचे आहे. त्यासाठी त्यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधला.


" भारतात परतण्यासाठी विमानाचे आरक्षण केले आहे. मात्र, तो प्रवास करता येणार नसल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे. त्यामुळे खाजगी विमाने जाण्यासाठी आणि नव्याने तिकिट काढण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. तरी शासनाने आमची मदत करावी, असे आफताब शेख यांनी सांगितले.


तर रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच रशियातील विद्यार्थ्यांना भारतात परतण्यासाठी तातडीने मदत करण्याची मागणी डीवायएफआय चे गणेश दराडे, प्रिती शेखर, क्रांतीकुमार कडुलकर, अमीन शेख यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा