Breaking
आरोग्य मित्र व स्वच्छता कर्मचारी यांना नगरसेविका, महिला संघटना व स्वयंसेवी संस्थेच्या वतीने फराळ - किराणा वाटप

पिंपरी चिंचवड आरोग्य मित्र व स्वच्छता कर्मचारी यांना नगरसेविका अश्विनीताई जाधव, अखिल भारतीय महिला संघटना व स्वयंसेवी संस्थेच्या वतीने फराळ, किराणाचे वाटप करण्यात आले.


शहरात 'त्यांची दिवाळी समृद्ध करूया !' या मोहिमेअंतर्गत किराणा किट, फराळ आणि मिठाई  वाटप करण्यात आले. चिखली येथील नगरसेविका अश्विनीताई जाधव यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेत काम केलेल्या ४५ आरोग्य मित्र, स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिठाई बॉक्स आणि फराळ वाटप कराण्यात आले.

जनवादी महिला संघटना आणि घर कामगार संघटना पिंपरी चिंचवडच्या अपर्णा दराडे यांनी सावली स्वयंसेवी संस्थेचा पुढाकारातून २५० गरजू महिला घरकामगाराना एक महिना पुरेल एवढे बिजलीनगर, पिंपळे सौदागर, चिखली, घरकुल येथे जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप केले.

देव-दर्शन युवामंच चिंचवड या स्वयंसेवी संस्थेच्या दिपक जाधव यांनी ६० मुलांना बंदुका फटाक्यांचे वाटप केले, तसेच त्यांना फराळ वाटप केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा