Breaking

DYFI च्या वतीने गरजूंना अन्नधान्याचे वाटप

मुंंबई : लॉकडाउनमुळे उपासमारी सहन करणाऱ्या देह व्यापार करणाऱ्या महिलांना कॉम्रेड मुकेश शर्मा यांनी भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांना अन्नधान्याची गरज होती. त्यांची समस्या लक्षात घेऊन डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) च्या वतीने अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. 


नालासोपारा पूर्व आणि पश्चिम मध्ये देहव्यापार करणारी शंभरहून अधिक महिला सहकुटुंब राहतात. त्यातील १५ कुटुंबियांना ही मदत करण्यात आली. तसेच अजून काही गरजू  कुटुंबांना त्वरित  अन्नधान्याची गरज आहे. त्यासाठी सुध्दा लवकरच मदत करणार असल्याचे सांगण्यात आले.


यावेळी 'डीवायएफआय'चे विभागीय कमिटी सचिव कॉ. गुलाब सिंग, राहुल गोरे, मुकेश शर्मा, राजेंद्र यादव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा