Breakingराज्यपालांना इपीएस ९५ पेन्शनर्स फेडरेशन भेटून घालणार साकडे

नाशिक : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी मंगळवारी ( दि.२ नोव्हें.) नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या भेटीसाठी वेळ मिळावा, यासाठी नाशिक जिल्ह्यातील इपीएस ९५ पेन्शनर्स प्रयत्नशील आहेत.


भगतसिंग कोशियारी राज्यसभेचे खासदार असतांना राज्यसभेत कामगार ना मिळणारी इपीएस ९५ पेन्शन औद्योगिक कामगार, सहकारी संस्था कर्मचारी, विविध महामंडळ कर्मचारी, सहकारी संस्था व संस्था कर्मचारी ,आदी १६२ क्षेत्रातील कामगारांना पेन्शन योजना १९९५ ला लागू झाली. नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक कामगार, साखर, एस टी महामंडळ, एच ए एल, विडी कामगार, पत्रकार आहेत.  


पेन्शनर्स मागण्यासंदर्भात राज्यसभेने २०११ मध्ये भगतसिंग कोशियारी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली होती. त्यां कमिटीने २०१३ मध्ये अहवाल सादर केला. त्या शिफारशी प्रमाणे ३ हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह द्या, सेवानिवृत्त कामगारांना मोफत आरोग्य सुविधा आदि शिफारशी केल्या होत्या. 


भाजप नेते तत्कालीन प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी आमचे सरकार आल्यास भगतसिंग कोशियारी  अहवाल लागू करू. मात्र सत्तेत आल्यावर ६ वर्ष होऊनही भाजप केंद्र सरकारने भगतसिंग कोशियारी शिफारशी लागू केल्या नाहीत. सातत्याने देशभरातील  ७० लाखाहून अधिक सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक आंदोलन करत आहेत. 


महाराष्ट्रातील अनेक अडचणीत आलेल्या राजकिय पक्ष, विविध व्यक्ती भेटीसाठी वेळ देत आहेत. शिष्टमंडळच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यांनी दिलेला अहवाल पंतप्रधानी स्वीकारावा. व २०१३ मध्ये केलेली शिफारशी ला ६ वर्ष झाल्याने किमान पेन्शन ९ हजार रुपये महागाई भत्ता सह मिळण्यासाठी देशातील ७० लाख पेन्शनर्स चे नेतृत्व  कोशियारी यांनी करावे, असे साकडे पेन्शनर्स राज्यपालांना घालणार आहेत, असे नाशिक जिल्हा पेन्शनर्स फेडरेशन संस्थापक अध्यक्ष राजू देसले, जिल्हा अध्यक्ष सुधाकर गुजराथी, सचिव डी. बी. जोशी, कार्यध्यक्ष सुभाष काकड, चेतन पणेर, प्रकाश नाईक, भाऊसाहेब शिंदे, रावसाहेब शिवले, नारायण अडणे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा