Breaking

रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी अजित पवार, अमोल कोल्हे करतायेत प्रयत्न

 


मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकारामुळे प्रशासानाकडून दखल

पिंपरी : रशियात कोरोनाची दुुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रशियाने तेथील ऑनलाइन शिक्षण बंद करुन ऑनलाईन शिक्षण दिले जाणार असल्याची सुचना जारी केली आहे. रशियातून भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात परतण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पिंपरी चिंचवड कमिटीने उपमुख्यमंत्री, तसेच स्थानिक आमदार, खासदार यांना पत्र आणि फोनद्वारे संपर्क करुन विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली होती. 

रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पिंपरी चिंचवड, पुणे, कोल्हापूर, मुंबईसह राज्यातील १२० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पत्रव्यवहाराची दखल घेत त्यांना सुखरूप भारतात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे क्रांतीकुमार कडुलकर, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे गणेश दराडे, प्रतिती शेखर यांनी अजित पवार, डॉ. कोल्हे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना मदतीची विनंती केली होती. 

अडकलेले बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले असून त्यात पिंपरी - चिंचवड आणि पुण्यातील चाळीस विद्यार्थी आहेत. त्यातील आफताब शेख या पिंपरी - चिंचवडमधील विद्यार्थ्याचा भाऊ अमीन याने याबाबत "महाराष्ट्र जनभूमी" ला माहिती दिली. तसेच क्रांतिकुमार कडुलकर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. 

 कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने ऑफलाईन लेक्चर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी परतायचे आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांनी एअर इंडियाची तिकिटे बुक केली होती. मात्र, हे विमान थेट नसल्याने रशियातील भारतीय दूतावासाने त्यांना परवानगी नाकारली. त्यांना थेट खासगी विमानाने आपल्या जबाबदारीवर जाण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्येकी 50 हजार रुपये देऊन काढलेली तिकिटे आता रद्द करावी लागणार आहेत. त्याचे त्यांना प्रत्येकी अवघे ८ हजार रुपये मिळणार असल्याने


विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे ! कारण, पुन्हा तिकीट काढण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे पैसे नाहीत.

केरळ राज्याचे काम कौतुकास्पद 

केरळ राज्याने कोरोनामुळे परदेशात अडकलेल्या आपल्या राज्यातील नागरिकांना आणण्यासाठी विशेष विमानाची सेवा दिली. महाराष्ट्राने ही आपल्या विद्यार्थ्यांना विशेष विमानाने आणावे, अशी विनंती 'डीवायएफआय' ने राज्य सरकारकडे केली आहे.

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी सर्व देश प्रयत्न करत आहे. दुसरीकडे रशियातील भारतीय दूतावास सहकार्य करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. 

डीवायएफआय आणि माकपच्या ई - मेल मिळताच मिळताच उपमुख्यमंत्री पवार आणि खासदार कोल्हे लगेच सक्रिय झाले. अजित पवारांनी मदत व पुनर्वसन विभागाला कार्यवाही करण्यास सांगितले. डॉ. कोल्हे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क केला. सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि वेळेवर रशियातून आणले जाईल, असा विश्वास खासदार कोल्हे यांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा