Breaking
हौसाबाई गुजर यांचे वृद्धापकाळाने निधनसातारा : श्रीमती हौसाबाई कोंडीबा गुजर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९५ वर्षाच्या होत्या.  मौजे तानस तालुका जावळी येथे आज (दि.३० ऑक्टो.) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्या DYDI पिंपरी चिंचवड संस्थापक सदस्य आणि माजी सचिव कॉम्रेड बाजीराव गुजर यांच्या मातोश्री होत्या. अल्पभूधारक शेतकरी असूनही त्यांनी एकत्र कुटुंबात त्यांनी अतिशय काटकसर करून स्वतःच्या मुलांना पिंपरी चिंचवड मध्ये  १९८० च्या दशकात औद्योगिक शिक्षणासाठी पाठवले.

त्यांच्या मागे नातवंडे आणि पंतवंडे असा खूप मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल DYFI चे कॉम्रेड गणेश दराडे, पिंपरी चिंचवड शहर समितीचे सचिव सचिन देसाई, किसन शेवते, अमिन शेख, स्वप्नील जेवळे, संतोष गायकवाड, अविनाश लाटकर यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा