Breaking


ठाणे शहरातील आदिवासींना शहापूर तालुका किसान सभेचा मदतीचा हातशहापूर  : गेल्या आठवड्यात वनखात्याने ठाणे शहराच्या येऊर परिसरातील ज्या 25 आदिवासी कुटुंबांचे भात, तूर, नागली पीक वन अधिकाऱ्यांनी उध्वस्त केले त्या कुटुंबांना मदत म्हणून शहापूर तालुका किसान सभेने 10 किलो तांदूळ, 2 किलो डाळ, 1 किलो तेल, 1 किलो साखर, 1/2 किलो मसाला, 1/4 किलो हळद, चहा पावडर, 4 साबण अशा एकूण 25 किट्स तयार करून देण्यात आल्या. 31 ऑक्टोबरला संध्याकाळी ठाणे शहराच्या परिसरात सभा घेऊन त्याचे वितरण करण्यात आले. 


यावेळी झालेल्या सभेत किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, जमसंच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, जमसंच्या राज्य सचिव प्राची हातिवलेकर, शहापूर तालुका किसान सभेचे नेते सुनील करपट, SFI चे जिल्हा सचिव भास्कर म्हसे यांची भाषणे झाली. दत्तू खराड सभेच्या अध्यक्षस्थानी होते.


23 ऑक्टोबरला किसान सभेच्या वतीने या अन्यायाविरुद्ध ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जबरदस्त निदर्शने करीत 1 तास संबंध रस्ता अडवून ठेवला. अखेर आपला विजय झाला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. या विजयाच्या पार्श्वभूमीवर या सभेत उत्साहाचे वातावरण होते. 

 

यावेळी ठाणे शहरातील दत्तू खराड, किशोर खराड, राजू कडू, विजय मातेरा, संदीप महाळूगे, शंकर डवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा