Breaking

आयटकचे कामगार - कर्मचारी चळवळीचे संघर्षाचे १०० वर्ष - ऍड. दत्ता निकम

२६ नोव्हेंबर रोजी होणारा संप यशस्वी करण्याचे आवाहन !


नाशिक : भारतातील पहिली कामगार संघटना असलेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) ची स्थापना ३१ ऑक्टोबर १९२० मध्ये झाली. आज ह्या संघटनेस १०० वर्ष पूर्ण होत आहे. देशातील कामगार कर्मचारी हिताचे कायदे करण्यासाठी आयटक ने केंद्र व राज्य सरकार ला वेळोवेळी भाग पाडले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयटकने मोठा पुढाकार घेतला होता. आयटक नेते कॉ श्रीपाद डांगे यांनी १७ वर्ष स्वातंत्र्य चळवळ व त्यानंतर कामगार चळवळीत हिरीरीने भाग घेऊन कारावास भोगला, असे हे नेतृत्व नाशिक जिल्ह्याचे सुपुत्र असल्याचा आयटक नाशिक जिल्ह्याला अभिमान आहे, आज देशातील दीड कोटी सभासद असलेली आयटक ही संघटना आहे व आयटकने १०० वर्ष संघर्ष करून कामगार, कर्मचारी, असंघटित कामगार, योजना कर्मचाऱ्यांना न्याय  मिळवून देण्यासाठी संघर्ष करीत आहे, असे आव्हान आयटक'चे जेष्ठ नेते ऍड. दत्ता निकम यांनी आयटक नाशिक जिल्ह्याच्या वतीने आयोजित शताब्दी वर्षाच्या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. 


पुढे ते म्हणाले की, मुंबईतील गिरणी कामगार चळवळीतील कामगारांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाचे व महत्त्वाचे योगदान होते. आयटक कामगार केंद्र नाशिक येथे शताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित कार्यक्रम कोरोनामुळे प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थिती पार पाडला. तसेच ३१ ऑक्टोबर हा आयटक जेष्ठ नेते कॉ. गुरुदास दासगुप्ता यांच्या प्रथमस्मृती दिनी त्यांना अभिवादन करण्यात आले. 


कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी वीज कामगार नेते आयटक नाशिक जिल्हाध्यक्ष कॉ. व्ही. डी. धनवटे होते. त्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. विचारमंचावर आयटक राज्य सचिव राजू देसले, शहर उपाध्यक्ष रावसाहेब ढेमसे, दत्तू तुपे, एस. खतीब हे होते.


कामगार चळवळीतील शहिदानां अभिवादन केले. आयटक ने आजपर्यंत कामगार कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी १०० वर्ष लढा देत आहे आणि मात्र आजचे केंद्र सरकार कामगार विरोधी धोरण राबवत आहे. कंत्राटी व मानधनावरील लाखो कर्मचाऱ्यांना तटपुंज्या मानधनावर राबवून घेत आहे. सेवानिवृत्त कामगारांना ईपीसी पेन्शनधारकांना तटपुंजी पेन्शन १००० रुपये मात्र मिळत आहे. कमीतकमी पेन्शन ९००० रुपये महागाई भत्यासह द्या, ह्या धोरणात्मक मागणी साठी देशव्यापी संप आयटक सह सर्व संघटनानी २६ नोव्हेंबर रोजी करणार आहेत व देशातील शेतकरी संघटना दि. २६ व २७ नोव्हेंबर २०२० रोजी शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ बंद पुकारला आहे. म्हणून देशातील शेतकरी- कामगार यांनी एकत्र येऊन केंद्र व राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारला असून जनतेने रस्त्यावर उतरावे, असे आवाहन आयटक चे राज्य सचिव राजू देसले यांंनी केले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही.डी. धनावडे म्हणाले, की कामगारांनी संघटितपणे केंद्र व राज्य स रकारच्या कामगार विरोधी धोरणांचा विरोध करावा, श्रीपाद अमृत डांगें सारख्या नेत्यांनी नेतृत्व केले आहे. हा वारसा पुढे चालवण्याचा आज संकल्प करण्याचे आवाहन केले. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. खतीब यांनी केले तर दत्तू तुपे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी राज्यसरकारी कर्मचारी संघटनेच्या सुनंदा जरांडे, कामगार सेनेचे उत्तमराव खांडबहाले, सिटू संघटनेचे शिवाजी भावले, इंटक चे बाळासाहेब कासार, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, वीज कामगार संघटनेचे अरुण म्हस्के उपस्थितीत होते. तसेच माकप चे तानाजी जायभावे, मिलिंद वाघ, ग्रीज काँटन राजु सावंदे, भिका मांडे, पेन्शन संघटना शिवाजी शिंदे, भाऊसाहेब शिंदे, वंचित बहुजन आघाडी आरुण शेजवळ, निलेश सोनवणे, हितेंद्र शारदुल, आप अँड. प्रभाकर वायचाळे, योगेश कापसे, महेंद्र दातरंगे अंधश्रद्धा निर्मूलन समिती, किरण मोहिते, सामाजिक कार्यकर्ते नाशिकांत पगारे आदीसह उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा