Breaking
पुणे शिक्षक मतदारसंघात शैक्षणिक चळवळीतील प्रा. डॉ. सुभाष जाधव यांची उमेदवारीपुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली असून विद्यार्थी चळवळ ते प्राध्यापक चळवळ असा प्रदिर्घ संघर्ष केलेले प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.

विविध प्राध्यापक व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला असल्याचे डॉ. जाधव यांनी म्हटले आहे. जाधव यांनी गेली ३० वर्षे डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथे अध्यापनाचे काम केले आहे. तसेच प्रदिर्घ असे शैक्षणिक चळवळीत काम केले व्यक्तिमत्व आहेत. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) आणि महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघा (एमफुक्टो) च्या माध्यमातून शिक्षक, प्राध्यापकांना न्याय देण्यासाठी ते सातत्याने संघर्ष करत आहेत. ते सुटाचे सहकार्यवाह तसेच एम फुक्टोचे राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा