Breaking
भारतीय नागरिकांनी स्वत: निर्बंध घालणे गरजेचे; युरोपियन राष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट - सुमित कदम


आकुर्डी (पिंपरी चिंचवड) - जर्मनीत नागरिकांनी निर्बंध स्वीकारले आहेत, कोरोनाची दुसरी लाट युरोपियन राष्ट्रांमध्ये आली आहे. हे लक्षात घेेेता भारतीय नागरिकांनी स्वत: निर्बंध घालणे गरजेचे आहे, असे युरोपमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी सुमित सुहास कदम यांनी सांगितले.


ते पुढे बोलताना म्हणाले की, युरोपचे आर्थिक, शैक्षणिक केंद्र असलेल्या जर्मनीमध्ये सरकारने सावधानतेचा इशारा देऊन नागरिकांनी स्वतः निर्बंध स्वीकारून सरकारला सहाय करावे, असे आवाहन केले आहे. भारतीय विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहोत, तसेच वर्क फ्रॉम होम करत आहोत. जर्मन सरकारने अद्यापही आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर बंदी घातलेली नाही. एक महिन्याची सुटी घेऊन आकुर्डी आणि कराड मधील माझे आई बाबा आणि नातेवाईक आणि वर्ग मित्रांना भेटावयास आलो आहे, असे सुमित कदम यांंनी सांगितले.

कोरोनाच्या पहिल्या लाटे मधून सावरलेल्या जर्मनी आणि इतर युरोपियन देशातील भारतीय विद्यार्थी आणि नोकरदार आणि संपूर्ण जर्मन नागरिक स्वयंशिस्त पाळून पुन्हा संसर्ग होणार नाही. याची दक्षता घेत आहेत. सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने सिनेमागृहे, पर्यटन स्थळे, पब आणि तारांकित हॉटेल यावर निर्बंध जारी केले आहेत. ख्रिसमस सणामुळे संभाव्य गर्दी टाळण्यासाठी मॉल, मेट्रो, सार्वजनिक बससेवा, गार्डन याचा नागरिकांनी कमीत कमी वापर करावा. लोकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी जर्मन सरकार नागरिकांना सतर्क करत आहे. 

जर्मनीत भारतीय आणि इतर देशातून आलेल्या प्रत्येक नागरिकांचा आरोग्य आणि जीवनविमा सक्तीचा असल्यामुळे येथे कोणत्याही आजारासाठी तातडीची रुग्णसेवा खर्चिक असली तरी परवडते. जर्मनीमध्ये शिक्षण आणि आरोग्य सेवेला सर्वात आधी प्राधान्य दिले जाते. अमेरिका इंग्लंडपेक्षा येथील शिक्षण भारतीय विद्यार्थाना अतिशय कमी खर्चाचे असते. येथील बँकांचे कर्ज व्याज दर ३/४ टक्केच्या आसपास आहेत, उच्च शिक्षणासाठी भारतीय बँकांकडून घेतलेले मोठ्या व्याजादाराचे कर्ज सहज फेडू शकतो.

भारतात येणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटे ला आपण रोखू शकतो त्यासाठी भारत सरकारच्या सर्व नियमांचे आपण पालन केले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा