Breaking

देवगाव येथे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जंयती साजरी !

अकोले : आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांची जंयतीदिनी (दि. 8 नोव्हेंबर) रोजी येथील देवगाव येथे साजरी करण्यात आली. अतिशय शांततेत ग्रामस्थाच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी डॉ. पोपेरे म्हणाले, की इंग्रज सरकारचे कर्दनकाळ म्हणून राघोजी भांगरे यांनी भारत देशात सर्वात प्रथम बंड पुकारून लढा दिला व इंग्रज सरकारच्या ताब्यात असलेल्या सह्याद्री च्या पट्यातील जमिनी आदिवासी शेतकरी यांना परत मिळवून दिल्या. अशा या महान राष्ट्रपुत्राचा इतिहास समाजात पोहोचविची गरज आहे 


यावेळी देवगावचे सरपंच सचिन भांगरे, पोलीस पाटील बालाजी भांगरे, अकोले पंचायत समितीच्या सदस्या जिजाबाई भांगरे, ग्रा. सदस्य निवृत्ती भांगरे, बाळू भांगरे, हरिभाऊ भांगरे, मोहन गभाले, नामदेव डामसे, रवि करवंदे, वारघुंशी ग्रामपंचायतीच्या सरपंच अनिता कडाळी, संकेत सामेरे, चित्राताई जाधव, गणेश डगळे उपस्थित होते.

1 टिप्पणी: