Breaking

नोकरी : भारतीय डाक विभागात १३७१ पदांची भरती

मुंबई  : भारतीय डाक विभागात विविध १३७१ पदांची भरती निघाली आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी आणि बारावी अशी असून संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.


पदाचे नाव व एकूण पदे –

पोस्टमन (PM) – १,०२९ पदे

मेल गार्ड (MG) – १५ पदे

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) – ३२ पदे

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (सबऑर्डिनेट ऑफिसर) – २९५ पदे


शैक्षणिक पात्रता :

मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण. मल्टिटास्किंग स्टाफ पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण.

मराठी भाषेचे ज्ञान, किमान दहावीपर्यंतच्या शिक्षणात मराठी विषय आवश्यक.

संगणकाचे ज्ञान आवश्यक

पोस्टमन पदासाठी दुचाकीचा वाहन परवाना आवश्यक


वयोमर्यादा :

पोस्टमन आणि मेल गार्ड पदासाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे

मल्टी टास्किंग स्टाफच पदासाठी वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे


अधिक माहितीसाठी  – 

https://bit.ly/3eq8gVW

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा