Breaking

पिंपरी चिंचवड शहरात एमएनजीएलचे प्लास्ट वेल्ड तंत्रज्ञान तत्पर दुरुस्ती सेवा कार्यरत

चिखली (पिंपरी चिंचवड) : राजे शिवाजी नगर से 16 येथे महाराष्ट्र नॅचरल गॅस लि (MNGL) ची गॅस पाइपलाइन तुटल्यामुळे गॅस पुरवठा बंद पडला होता. नगरसेविका अश्विनी ताई जाधव यांनी मोबाईल मेंटेनन्स सेंटरला तातडीने फोन केला. MNGL च्या टीममधील तंत्रज्ञांनी प्लास्ट वेल्ड तंत्रज्ञान वापरून अर्ध्या तासात पाईपलाईन जोडून गॅस पुरवठा सुरळीतपणे सुरू केला.


सध्या शहरात मनपाची विकासकामे सुरू आहेत. गॅस पुरवठा विस्कळीत होऊ नये, म्हणून मेंटेनन्स अँड ऑपरेशन विभागाची टीम आणि मोबाईल व्हॅन 24 तास कार्यरत आहे. भारत सरकारच्या या गॅस वाहिनीच्या वाकड भूमकर चौक येथील कार्यालयातून देखभाल दुरुस्ती नियंत्रित केली जाते.


पिंपरी चिंचवड शहरात MNGL च्या घरगुती गॅसच्या मोठ्या वाहिन्या आहेत. शहरातील गृहिणींना या गॅस वर स्वयंपाक करणे अतिशय सुरक्षित असते आणि किफायतशीर असते. स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामे सुरु आहेत. अनावधानाने प्लास्टिक पाईप लाईन तुटते, मेन्टेन्सच्या मोबाईल व्हॅन मध्ये आठ तज्ञ कर्मचारी असतात. अनेक वार्डात जागरूक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि MNGL यांच्यात समन्वय असल्यास तात्काळ दुरुस्ती होते. परंतु अनेक ठिकाणी. खूप उशीर होत असतो.


गॅस पुरवठा त्वरित सुरू केल्याबद्दल अश्विनी ताई जाधव, संतोष जाधव आणि राजेंद्र बनकर आणि एमएनजीएल टीमचे नागरिक कौतुक करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा