Breaking


बिहारमध्ये अल्पवयीन मुलींंवर अत्याचार करुन खून; माहूर येथे गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्यासाठी निदर्शने


माहूर (नांदेड) : बिहारमध्ये अल्पवयीन मुलींंवर अत्याचार करुन खून करून दोन नराधमांनी तिच्यावर जबरदस्ती करून रॉकेल टाकून जाळले. या घटनेच्या विरोधात नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे गुन्हेगारांना तात्काळ अटक करुन कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. तसेच माहूर तालुक्याचे तहसीलदार वरनगावकर यांना निवेदन देण्यात आले.


यावेळी आंबेडकरी चळवळीचे नेते सिद्धार्थ तामगाडगे, सईद अली, एसएफआय चे जिल्हा सहसचिव प्रफुल्ल कउडकर, माजी नगरसेवक प्राचार्य राजेंद्र केशवे, माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, जयकुमार अडकीने, डॉ. निरंजन केशवे, डॉ. सत्यम गायकवाड, 


काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद पाटील अविनाश टनमने, किसन राठोड, अल्ताफ शेख, असिफ पटेल, शेख इरफान करीम शाह, सलमान काझी, सुधीर साबळे, सिद्धार्थ मुळे, घनश्याम केशवे, रजकिरण देशमुख, ऑल इंडिया पँथर सेने चे अभी खंदारे, चंचल मुनेश्वर, जिब्रान कुरेशी, रफिक सौदागर, मोइन खान उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा