Breaking

कांद्याला बाजारात तेजी; शेतकरी राजा खुश

चाकण (पुणे)  : सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी खुश आहे. महात्मा फुले मार्केटमधे बुधवारी ( दि.४ ) रोजी कांद्याला प्रति किलो ५५ रुपये आणि बटाट्याला प्रतिकिलो ३४ रुपये भाव मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग खुश झाला आहे.


खेड, राजगुरूनगर, मंचर, आंबेगाव, मोशी, दुडुळगाव, चऱ्होली, दावडी इ ग्रामीण भागात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. पुणे, पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक बाजारपेठेत चाकणच्या कांद्याला मोठी मागणी असते. काल एका दिवसात ४०० क्विंटल आवक झाली होती.

 

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीने यावर्षी कांदा आणि बटाटा उत्पादकांना चांगला बाजारभाव दिला आहे. दिवाळी यावर्षी अतिशय आनंदाची जाईल, असा विश्वास व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा