Breaking

घरकुल पोलिस चौकी कार्यान्वित करा, DYFI सह जनवादी महिला संघटनेची

चिखली (पुणे) : घरकुल वसाहत येथे २०१६ साली पोलीस चौकीसाठी एक प्रतिक्षलाय बांधण्यात आले. या ठिकाणी २४ तास पोलीस चौकी नागरिकांच्या तक्रारी आणि सुरक्षिततेसाठी कार्यरत होईल, अशी आश्वासने देण्यात आली.


परंतु गेले पाच वर्षे कर्मचारी आणि प्रशासकीय व्यवस्थापन आणि दैनंदिन बंदोबस्तासाठी येथे आयुक्तालयांने पोलीस कर्मचारी नेमणूक केलेली नाही. नागरिकांना आपत्कालीन पोलीस मदतीसाठी सानेवस्ती, कुदळवाडी किंवा चिखली पोलीस स्टेशनला जावे लागते. परिसरात खून मारामाऱ्या, चोऱ्या, अवैध धंदे वाढलेले आहेत.


सदरची पोलिसचौकी अधिकृत सर्व सोयींनीशी सुरु करावी, अन्यथा चौकीच्या बंद इमारती जवळ ठाण मांडून आंदोलन करण्याचा इशारा डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यानी दिला आहे.


यावेळी किसन शेवते, अविनाश लाटकर, संजय ओहोळ, ख्वाजा जमखाने, निर्मला येवले, सुषमा इंगोले, रंजिता लाटकर, शामल ओहोळ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा