Breakingबांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित लाभासह यंदाचे बोनस तातडीने अदा करा - अँड. एम. एच. शेख

 

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला बांधकाम कामगारांनी घातला वेढा व जोरदार निदर्शने


सोलापूर : बांधकाम कामगार हा कामाची अनिश्चिती असणारा आणि बांधकाम व्यावसायिकावर जगणारा घटक आहे.म्हणून सरकारने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची निर्मिती केली. यासाठी बांधकाम उपकर वसूल केले जाते. या उपकर पूर्ण वापर बांधकाम कामगारांसाठी करण्यात यावा आणि दिवाळीला तातडीने बोनस अदा करावे, अन्यथा अभिनव आंदोलन करण्याचा इशारा सिटू चे राज्य महासचिव अँड एम. एच. शेख दिला.


 आज ४ नोव्हेंबर रोजी लाल बावटा बांधकाम कामगार युनियन च्या वतीने विविध प्रलंबित मागण्या घेऊन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला वेढा घालून निदर्शन करण्यात आले. यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली. 


यावेळी सिटू चे राज्य महासचिव अँड एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगार युनियनचे पदाधिकारी सिद्राम म्हेत्रे, माजी नगरसेवक माशप्पा विटे, प्रा.अब्राहम कुमार, अनिल वासम आदींच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्त निलेश यलगुंडे यांना विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यानंतर यलगुंडे यांनी सर्व मागण्या मान्य होतील या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.


यावेळी कामगार कायद्यातील बदल व त्यांचे कामगार संहितेचे रूपांतर त्वरित रद्द करा, कामगार कायदे अधिक मजबूत करा बांधकाम कामगारांची नोंदणी त्वरित सुरू करा व नोंदणीच्या जाचक अटी रद्द करा, नोंदणीसाठी अर्ज केलेल्या कामगारांना त्वरित सेवा पुस्तक द्या, कल्याणकारी मंडळाकडून लॉकडाउन काळात मिळणारे ५ हजार रुपये लाभ सर्व नोंदीत कामगारांना त्वरित अदा करा, कोविड १९ मुळे कामगारांचे नूतनीकरण वेळेत झाले नाही, पण अशा कामगारांचे नूतनीकरण हे संगणक पध्दतीने झाले नाही. अशा कामगारांचे नूतनीकरण आपल्या कार्यालयातून करण्यात यावे, या कामगारांना देखील लाभ त्वरित मिळावे. अवजारे खरेदी, गृहउपयोगी वस्तू देण्यात येणारे लाभ ही योजना पूर्वत सुरुवात करण्यात यावे, ३ वर्ष झालेल्या कामगारांना हे लाभ देण्यात आले नाही. ते त्वरीत देण्यात यावे.


कोविड-१९ मुळे कार्यालयीन कामकाज बंद असल्याने मागील वर्षापासून नवीन नोंदणी करिता अर्ज सादर केलेल्या कामगारांवर अन्याय झाला आहे. यामुळे या कामगारांचा नोंदणी त्वरित करण्यात यावी तसेच ओळखपत्र त्वरित देण्यात यावे. सुरक्षा संच व अत्यावश्यक संच प्रत्येक कामगारांना त्वरीत देण्यात यावे, दिवाळी बोनस स्वरूपात कामगारांना दहा हजार रुपये देण्यात यावे, कामगार मेडिक्लेम योजना पूर्ववत सुरू करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.


यावेळी शंकर म्हेत्रे, परशुराम बंदपट्टे, तानाजी जाधव, अशोक तंबोळु, अमित मंचले, चिदानंद चण्णापागोलू,  श्रीकांत कांबळे, अमित मंचले, पुष्पा गुरुपनवरू, अजय भंडारे, इशाद कुमार, दत्ता चव्हाण, विजय हरसुरे यांच्यासह कामगार उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीकांत कांबळे तर आभार माशप्पा विटे यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा