Breaking




लोकांनी वीज‌ वापरली असून त्याचे बिल भरावे त्यात कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही ऊर्जामंत्री राऊत यांचा ग्राहकांना झटका

मुंबई - लॉकडाऊन काळात अनेकांचे रोजगार गेले, त्यात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसला असताना अशातच आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सर्वसामान्यांना दुसरा झटका दिला आहे. ऊर्जामंत्री राऊत यांनी लोकांनी वीज‌ वापरली असून त्याचे बिल भरावे त्यात कुठलीही वीजबिल माफी मिळणार नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.


नितीन राऊत म्हणाले कि, वीज वापरली तितकेच बिल आले पाहिजे. कोणाचेही वीज कनेक्शन कट होणार नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. तसेच योग्य बिल नसेल तर त्याची तक्रार करावी. मीटर पाहणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.


राज्यात बिल सवलत याबाबत केंद्र सरकारने मदत करावी. पण केंद्र सरकारने मदत केली नाही. वीजबिल सवलत तूर्तास मिळेल असे वाटत नाही, असे राऊत यांनी सांगितले.


वीज कंपनीने लॉकडाऊनमध्ये २४ तास वीजपुरवठा केला. महावितरणवर ६९ हजार कोटी कर्ज आहे. आम्ही कर्ज काढून कामकाज करत आहोत अजून किती करणार? असेही राऊत यांनी म्हंटले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा