Breaking
आ. प्रकाश सोळंके व जयसिंग सोळंके यांनी आदेश दिल्यास वडवणी न. पं. निवडणुक लढवणार - किशोर शिंदे

वडवणी : वडवणी नगर पंचायत निवडणुक २०२१ साठी आपण तयार असुन माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प.सभापती जयसिंग सोळंके आदेश देतील त्या वार्डातुन आपण निवडणुक लढण्यास तयार आहोत, असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर शिंदे यांनी म्हंटले आहे.


गेल्या १८ वर्षांपासुन आपण विद्यार्थी - युवक चळवळीत सक्रीय असुन, विद्यार्थ्यांचे प्रवेश, स्कॉलरशीप, फीस वाढ आदी समस्यांना हात घालत प्रश्नांची सोडवणुक करण्याचे काम केले आहे. विद्यार्थी - युवकांच्या प्रश्नांबरोबरच शेतकरी, कामगारांच्या लढ्यांमध्येही आपण सक्रीय सहभाग दिलेला आहे. २०११ साली झालेल्या देशव्यापी भष्ट्राचारविरोधी आण्णा हजारे प्रणित आंदोलनामध्येही आपण सक्रीय सहभाग घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे.


गेल्या दोन वर्षांपासुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन आपण पेट्रोल-डिझेल दरवाढ, राफेल, दलित अत्याचार, महिला अत्याचाराच्या मुद्दयांवर आंदोलने केली असुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसला बळकट करण्याचं काम केलं आहे. आ. प्रकाश व जयसिंग सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक निवडणुकांमध्ये प्रामाणिक व सक्रीयपणे काम केले असुन, येथुन पुढेही आपण असेच काम करणार आहोत. येणाऱ्या नगर पंचायत निवडणुकीमध्ये आपण सक्षम उमेदवार असुन पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास निवडुन येण्याची क्षमताही आपल्यामध्ये असल्याचे प्रसिध्दी पत्रकात किशोर शिंदे यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा