Breakingराष्ट्र सेवा दलाचे वतीने मौलाना आझाद यांचेवरील पुस्तक प्रकाशितइचलकरंजी (कोल्हापूर) : राष्ट्र सेवा दलाच्या वतीने राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त मौलाना आझाद यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मौलाना आझाद यांचेवरील 'राष्ट्रनिर्माता' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. 

मालती माने विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय रेंदाळकर यांचे संकल्पनेतून आणि रोहित दळवी व गौरी कोळेकर यांच्या संकलनातून साकार झालेले चरित्रात्मक संपादनाचे हे पुस्तक आंतरभारती विद्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात लेखक साहिल शेख यांचे हस्ते प्रकाशित झाले.

प्रकाशन करताना साहिल शेख म्हणाले, "या पुस्तकाच्या माध्यमातून मौलाना आझाद यांना राष्ट्रनिर्माता नावाने सादर करणे हे आजच्या काळात अत्यंत महत्वाचे आहे."

पुस्तकाचे संपादन करणारे संजय रेंदाळकर, रोहित दळवी आणि गौरी कोळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. पुस्तक प्रकाशन प्रसंगी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे आफताब जमादार, वनिता दळवी, ज्योती कोळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विनायक चव्हाण होते. 

यावेळी सुनिल स्वामी, मुख्याध्यापक एम.डी.पाटील,  इंद्रायणी पाटील, सदा मलाबादे, रुचिता पाटील, सूरगोंडा पाटील, वैशाली हुबळे, प्रविण आंबले उपस्थित होते. स्नेहल माळी यांनी स्वागत केले, तर अक्षय कांबळे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करुन दिली. विभावरी नकाते यांनी सूत्रसंचालन केले,  तर सौरभ पोवार यांनी आभार व्यक्त केेले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा