Breaking

पुणे पदवीधर मतदान संघातून प्रा. डॉ. निलकंठ खंदारे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

पुणे : पुणे पदवीधर मतदान संघातून प्रा. डॉ. निलकंठ खंदारे यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. 


त्यावेळी कोविड - 19 च्या संदर्भाने फक्त २ व्यक्तींना आत प्रवेश होता. तरीही खंदारे यांना पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते तसेच शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते.


यावेळी बोलताना खंदारे म्हणाले, की माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करुन दाखवेन. पुणे पदवीधर मतदार संघात त्यांनी १ लाखापेक्षा जास्त मतदार नोंद केले आहेत. त्यांचा ५ जिल्ह्यात मोठा मित्रपरिवार आणि दांडगा संपर्क आहे.


पदवीधर बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करण्यासाठी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सरकारी स्पर्धा परीक्षा केंद्र आणि हॉस्टेल ची स्थापना करणे, इंजिनिअर, पॅरा मेडिकल, फार्मसी, व्यवस्थापन, कृषी तसेच इतर क्षेत्रासाठी आपल्याकडे मास्टर प्लान आहे आणि तो राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खंदारे यांनी सांगितले . यापूर्वी च्या कोणत्याही पदवीधर आमदाराने जे काम केले नाही, ते आपण करून दाखवू, असे ही ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा