Breaking
मानव मुक्ती मिशनच्या प्रदेश उपाध्यक्षपदी रफिक शेख यांची निवड.

जालना : मानव मुक्ती मिशनचे आज ( दि. ३१ ऑक्टो) जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. या शिबीरात उदघाटन सत्रात ऍड. ए. आर. अंबारी यांच्या हस्ते उदघाटनाने शिबिराची सुरुवात झाली. 


मानव मुक्ती मिशनच्या या शिबिरात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत रफिक शेख यांची प्रदेश उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली. यावेळी मानव मुक्ती मिशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन सावंत, ऍड. ए. आर. अंबरी व ऍड. शहा उपस्थित होते. 


दुसऱ्या सत्रामध्ये नितीन सावंत यांनी मार्गदर्शन केले. शिबिराचे आयोजन अनिल भुतेकर तालुका अध्यक्ष मानव मुक्ती मिशन भोकरदन, राष्ट्रजागृती वारकरी परिषद तालुकाध्यक्ष शंकर महाराज, ह.भ.प. शिवाजी महाराज इंगळे यांनी केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा