Breaking
...पुन्हा लॉकडाऊनसाठी केंद्राकडे मागितली परवानगी

दिल्ली : प्रदूषित वातावरण आणि दिवाळसण या दरम्यान राजधानी दिल्लीत कोरोना संसर्गाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्ली सरकारतर्फे 'बत्ती ऑन, गाडी ऑफ' या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. तसेेे पुन्हा लॉकडाऊनसाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे.
    
कडाक्याच्या हिवाळ्यात दररोज पंधरा हजार रुग्णांची भर पडण्याचे तज्ज्ञांनी भाकीत केले आहे. बाजारपेठा तात्पुरत्या बंद करण्याची केजरीवाल सरकारने नायब राज्यपालांकडे मागणी केली आहे.


विवाह सोहळे आणि सभा - मेळाव्यांसाठी दिलेल्या सर्व सवलती मागे घेण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. शेतातील कचरा जाळण्यामुळे फैलावलेल्या प्रदूषणात फटाक्यांची भर, थंडीचा वाढता प्रभाव, दिवाळीच्या खरेदीसाठी ओसंडून वाहणाऱ्या बाजारपेठा यामुळे राजधानी दिल्लीत कोरोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. नोव्हेंबरच्या पूर्वार्धातच कोरोना रुग्णसंख्येत एक लाखाची भर पडली असून सुमारे बाराशे जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विक्राळ रूप धारण करीत असलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी बाजारपेठा तात्पुरत्या बंद करण्याची मागणी केजरीवाल सरकारने नायब राज्यपालांकडे केली आहे.


दिल्लीतील विवाह सोहळे आणि सभा मेळाव्यांसाठी दिलेल्या सर्व सवलती मागे घेण्याचा निर्णय 'आप' सरकारने घेतला आहे. यापुढे विवाह सोहळ्यांमध्ये २०० ऐवजी ५० जणांनाच सहभागी होता येईल. कोरोनाचा आणखी फैलाव होऊ नये, म्हणून दिल्ली सरकारने छठ पूजेनिमित्त २० नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, अशी अपेक्षा आहे. 

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राज्यांना लॉकडाउनसाठी केंद्राची मंजुरी आवश्यक आहे. त्यानुसार केंद्राकडे स्थानिक बाजारपेठांमध्ये लॉकडाउन लावण्यासाठी मंजुरी मागितली असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा