Breaking
UPSC ची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा २६ हजार रुपये मिळणार

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण इतर समाज घटकांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. आदिवासी विद्यार्थी हे अति दुर्गम भागात राहतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असते. तशाही परिस्थितीत ते शिक्षण घेऊन शिक्षित होतात.


केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याकरिता प्रशिक्षणाची व्यवस्था करावी अशा प्रकारची मागणी राज्यातील विविध आदिवासी लोकप्रतिनिधी/संघटना कडून करण्यात येत होती, या अनुषंगाने बार्टी, पुणे या संस्थेच्या धर्तीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी व मुख्य परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीच्या तयारी करिता प्रोत्साहनपर उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन आणि १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी असे एकूण २६ हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी दिली. 

उमेदवारांची पात्रता :

- उमेदवाराने केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षेचे प्रवेश पत्र (Hall Ticket) देणे आवश्यक असणार आहे.

- उमेदवारांची परीक्षेची अर्हता, शिक्षण, वय व इतर पात्रता व अटी पूर्ण केलेल्या असायला हव्या.

- प्रशिक्षाणार्थीने चालू वर्षामध्ये संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाली असली पाहिजे. व त्याचा UPSC Detail Application Form ( DAR ) फॉर्म ची छायांकित प्रत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये जमा करणे आवश्यक असणार आहे.

- उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी/अधिवासी असला पाहिजे.

- उमेदवाराची जमात ही महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादी मधील असणे आवश्यक.


या योजने अंतर्गत पात्र उमेदवाराना निधीचे वितरण थेट उमेदवाऱ्यांच्या खात्यात करण्यात येणार आहे. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा