Breaking

कॉ. तुळशीदास किल्लेदार सामाजिक ट्रस्ट मार्फत तरुणांसमोरील आव्हाने आणि व्यवसायाच्या संधी या विषयावर चर्चासत्र

कागल (कोल्हापूर) : कॉ. तुळशीदास किल्लेदार सामाजिक ट्रस्ट मार्फत तरुणांसमोरील आव्हाने आणि व्यवसायाच्या संधी या विषयावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे MKCL चे  विनायक कदम यांंनी मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ. अशोक मडके आणि प्रमुख उपस्थिती कॉ. हरिदास पोवार होते. कार्यक्रमास ऑनलाईन २५ सदस्य उपस्थित होते. 


शैक्षणिक पद्धत, मर्यादित नैसर्गिक साधन संपत्तीचा अमर्याद वापर, रोजगाराची खरी व्याख्या, रोजगाराचे प्रकार, व्यवसायासाठी आणि रोजगारासाठी असणारे प्रमुख अडथळे, व्यवसाय निवड, मार्केट, मार्केटिंग, सहकार तत्व मुद्यावर चर्चा केली.


तरुणांचा व्यवसाय व रोजगराकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टीकोन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी, भीती याच्या पलिकडे जाऊन आऊट ऑफ बॉक्स विचार करायला भाग पाडणारे चर्चासत्र होते. 


एक मेका सहाय्य करू ... अवघे धरू सुपंथ ही सहकार भावना उपस्थितांमध्ये जागवली. सत्रातून युवकांचा व्यवसायाच्या संधी स्वतः शोधून समूहाने काम करण्याची प्रेरणा दिली. सूत्रसंचालन संदेश जाधव यांनी केले, तर सुजय भारमल यांनी आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा