Breaking
पुणे पदवीधर मतदारसंघ म्हणजे राजकीय पुनर्वसन करण्याची जागा नाही


सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघात होऊ घातलेल्या निवडणुकीत अनेक इच्छुक उमेदवार विविध पक्षात आणि संघटनांमध्ये पाठिंबा आणि उमेदवारी मागण्यासाठी धडपडताना दिसतात. मात्र केवळ आपण बड्या घराण्यातील व्यक्ती, बडे उद्योगपती, कारखानदार, शिक्षण सम्राट, आमदार, खासदार व  मंत्र्यांचे नातेवाईक असणे हीच पात्रता समजून  उमेदवारीसाठी लॉबिंग करताना दिसतात. अनेक जणांना मागच्या निवडणुकीत विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापौर, विषय समित्या यामध्ये पदे न मिळालेले तसेच नाराज उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी पदविधारांच्या क्षेत्रात काम न केलेल्या व्यक्तीला केवळ राजकारणासाठी उतरविले जाते. त्यामुळे पदविधरांचे खरे प्रश्न तसेच राहतात. वर्षानुवर्षे हेच चित्र पाहायला मिळते. खऱ्या कार्यकर्त्याला कधीच संधी मिळत नाही हे जनता वेळोवेळी पाहत आली आहे. यावेळी आपल्या उमेदवारी मुळे ही समीकरणे बदलून जातील असा विश्वास प्रा. डॉ. निलकंठ खंदारे यांनी व्यक्त केला.

 

पुणे पदवीधर मतदारसंघात प्रा. डॉ. निलकंठ खंदारे यांची उमेदवारी ही शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ आणि सोलापूर व पुणे विद्यापीठाशी संलग्न शिक्षक संघटना तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या इतर २० पेक्षा जास्त शिक्षक शिक्षकेत्तर आणि राजकीय संघटना यांच्या पाठिंब्याने जाहीर केली आहे. डॉ. खंदारे हे शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य असून गेली २५ वर्षे ते शैक्षणिक चळवळीत सक्रिय सहभागी आहेत. ते स्वतः विनाअनुदानित आणि नेट सेट ग्रस्त सारख्या समस्यातून गेले आहेत. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील एक जाणकार व्यक्ती म्हणून त्यांच्या पुणे पदवीधर च्या उमेदवारी कडे पाहिले जात आहे.  

बेरोजगार पदविधरांच्या हाताला काम, शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे, जुनी पेन्शन मिळवणे, तासिका तत्त्वावरील शिक्षक,  विनाअनुदानित, २०% अंशतः अनुदानित घोषित आणि अघोषित अनुदानाच्या संदर्भात प्रश्न, नेट सेट, पीएचडी संदर्भात असणारे प्रश्न, व्यावसायिक शिक्षणातील अनागोंदी व त्यांचा महिनोंमहिने वेळेत पगार न होणे, सेवशाश्वती नसणे, फंड व ग्रँचुईटी न मिळणे, या न्यायहक्कांसाठी आपण विधीमंडळात निकराचा लढा देऊन, प्रश्नांना वाचा फोडून न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

डॉ. खंदारे यांनी पुणे पदवीधर साठी १ लाख पेक्षा जास्त नावनोंदणी केली असून ५ जिल्ह्यात त्यांचा दांडगा संपर्क आहे. वरील मुद्यांवर लक्ष केंद्रित करून आपण निश्चितच ही निवडणूक जिंकू असा विश्वास त्यांचे सहकारी पदवीधर व शिक्षक व्यक्त करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा