Breaking

पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात ही गुन्हा दाखल; पत्नीला कधीही होऊ शकते अटक

रायगड : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयानं त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता अर्णव गोस्वामी यांच्या पत्नीलाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


रायगड पोलीस काल अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी अर्णव गोस्वामी यांच्यासह त्यांच्या पत्नीने रायगड पोलिसांच्या कारवाईला विरोध करून त्यांना धक्काबुक्की केली होती. त्याविरोधात रायगड पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानावडे यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावरूनच त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


याशिवाय, पोलिसांकडून अर्णव गोस्वामी यांची पत्नी आणि मुलाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा या दोघांवर आरोप ठेवण्यात आला आहे. रायगड पोलिसांची टीम अर्णव गोस्वामी यांच्या घरी अटक करण्यासाठी आली होती. त्यावेळी अर्णव गोस्वामी यांना अटक करत असताना त्याची पत्नी आणि मुलाने पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला. ते पोलिसांनी घेऊन जाण्यास मज्जाव केला, त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी काल अर्णव गोस्वामी यांना अटक केल्यानंतर त्याला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा अलिबाग पोलिसांनी सेशन्स कोर्टात धाव घेऊन अर्णव गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा