Breaking

बीडमधील कम्युनिस्ट नेते कॉ. प्रा. मारोती वाघमारे यांचे दुःखद निधन !

बीड : बीड येथील कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. प्रा. एम. एस. वाघमारे सर यांचे आज दुःखद निधन झाले. आजारपणामुळे ते औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात मागील १५ दिवसांपासून उपचार घेत होते. प्रा. वाघमारे हे बीड येथील बलभीम महाविद्यालयात प्राध्यापक होते. 


महाविद्यालयीन जीवनात त्यांनी डाव्या विद्यार्थी संघटनेत कार्य केले. नंतरच्या काळात प्राध्यापक म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी चळवळीशी कायम नाळ ठेवली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित सीटू कामगार संघटनेची जबाबदारी त्यांनी पार पाडली. ते सीटूचे बीड जिल्हा कमिटी सदस्य होते. बीडमध्ये एसएफआय या विद्यार्थी संघटनेच्या वाढीत मोलाचे योगदान होते. त्यांनी कार्यकर्त्यांना नेहमी सहकार्य केले. महाविद्यालय असो किंवा इतरत्र कुठेही कार्यकर्ते भेटले तर कॉ. प्रा. वाघमारे सर सतत त्यांना चहापान करत. कार्यकर्त्यांशी हितगुज करून त्यांची विचारणा करत. बीड शहरातील एसएफआयसाठी कॉ. प्रा. वाघमारे पालक म्हणूनच होते. त्यांच्या यावेळी, अनपेक्षित जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी दु:खद भावना एसएफआय चे राज्य सचिव रोहिदास जाधव यांंनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा